Mon, Nov 19, 2018 12:43होमपेज › Pune › सतीश आळेकर यांना तन्‍वीर पुरस्‍कार 

सतीश आळेकर यांना तन्‍वीर पुरस्‍कार 

Published On: Dec 02 2017 1:23PM | Last Updated: Dec 02 2017 1:23PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ लेखक, नाटककार, अभिनेते सतीश आळेकर यंदा मानाचा तन्वीर पुरस्कार जाहीर करण्यात आला.  याशिवाय यंदाचा नाट्यधर्मी पुरस्कार मुंबई फॅट्स थिएटर संस्थापक फैजे जलाली यांना जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकी माऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक आहेत. त्‍यांच्या एकांकिकाही खूप गाजल्या आहेत.