Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Pune › ससून अधिष्ठातांची हकालपट्टी करा : भूमाता ब्रिगेड (video)

ससून अधिष्ठातांची हकालपट्टी करा : भूमाता ब्रिगेड (video)

Published On: Jul 04 2018 1:38PM | Last Updated: Jul 04 2018 1:38PMपुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून २०११ पासून ते या पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केली असून आठ दिवसात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडने केली आहे. याबाबत भूमाताच्या अध्यक्ष तृप्‍ती देसाई पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी चंदनवाले यांच्याकडे कारवाई केली नाही तर आंदोलन करून अधिष्ठातांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे सांगितले अहे. 

ससून रुग्णालयाची अधिष्ठाता ही जागा महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत देण्यात आली होती. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्‍यक्‍तीसाठी ही जागा आरक्षित होती. या जागेसाठी डॉ. अजय चंदनवाले यांनी आपले अपंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ते या पदावर कार्यरत आहेत. ही शासनाची फसवणूक असून याबाबत तीन डॉक्‍टरांची समिती नेमूण ऑनलाईन चौकशी करून त्यांची हकालपट्टी करावी अन्यथा भूमाता ब्रिगेड त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचे सांगितले आहे. चौकशी करून आठ दिवसात ही कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

मंत्री गिरिश महाजन यांचे निकटवर्तीय

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे जळगावचे असून ते मंत्री गिरिश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. महाजन यांनी याप्रकरणी त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता त्‍यांच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही कारवाई करावी अशीही मागण्या करण्यात आली आहे.