Wed, Nov 21, 2018 19:27होमपेज › Pune › पुणे : ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटात पोहचली (Video)

पुणे : ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटात पोहचली (Video)

Published On: Jul 09 2018 12:11PM | Last Updated: Jul 09 2018 3:22PMपुणे : प्रतिनिधी

माऊली... माऊली... चा जयघोष करत, टाळ-मृदुंग आणि पखवाजाच्या तालावर नाचत, हडपसर वासीयांच्या सेवेचा लाभ घेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या.  दोन्ही पालख्या दिवेघाटात पोहचल्या आहेत.

दरवर्षी दोन्ही पालख्यांवर वरुण राजाची होणारी बरसात यावेळी मात्र झाली नाही. सकाळी साडेनऊच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हडपसर येथे आगमन होताच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना विविध फळे आणि खाऊ वाटप करून त्यांना प्रवासासाठी पुढे मार्गस्थ करण्यात आले. आज सासवड येथे या पालखीचा मुक्काम आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे हडपसर येथे साडेबाराच्या सुमारास आगमन झाले. तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.