Thu, Apr 25, 2019 13:50होमपेज › Pune › संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकडे रवाना(व्हिडिओ) 

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकडे रवाना(व्हिडिओ)

Published On: Jul 12 2018 2:17PM | Last Updated: Jul 12 2018 2:17PMपाटस/केडगाव : वार्ताहर 

वरवंड मुकामाला असणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरुवारी (दि 12)  सकाळी साड्डेआठ वाजता भागवतवाडी येथील ग्रामस्थांच्या दर्शनासाठी दहा मिनिटे विसाव घेऊन पालखी सोहळा नागेश्वर मंदिराच्या दिशेने रावना झाला. 

पाटस येथील मुख्य चौकात सकाळी  ९ च्या दरम्यान ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पाटस गावातील  ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात दुपारचा विसावा घेतला. दर्शनासाठी पाटस परिसराबरोबर दौंड, सिद्धटेक, गिरीम कुरकुंभ, श्रीगोंदा या भागातील लोक आले होते. दर्शनासाठी ग्रामस्थांच्या रंगा लागल्या होत्या. स१०.३० च्या  वाजता पालख्या विसवल्या. आज तीन च्या सुमारास पालखी दौंड तालुक्यातून निरोप घेणार असून बारामती तालुक्यात प्रस्तान केले.