Tue, Apr 23, 2019 22:29होमपेज › Pune › संभाजी भिडेंनी केले तुकोबांच्या पालखीचे सारथ्य 

संभाजी भिडेंनी केले तुकोबांच्या पालखीचे सारथ्य 

Published On: Jul 07 2018 9:03PM | Last Updated: Jul 07 2018 9:03PMपुणे : प्रतिनिधी 

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सारथ्य केले. शनिवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता तुकोबांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. त्यानंतर पालखी वाकडेवाडी पुलावरुन शिवाजीनगरला आली. त्यावेळी संभाजी भिडे यांनी महाराष्ट्र बँकेसमोरुन ते शिमला ऑफिस चौक पर्यंत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सारथ्य केले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाखो भाविकांची मांदियाळी, हरिनामाचा गजर, अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी (दि. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यनगरीत दाखल झाली. या पालखीत सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात दुपारीच दाखल झाले होते. त्यांच्या सोबत शिवप्रतिष्ठानचे शेकडो धारकरी ही त्यांच्यासोबत पुण्यात दाखल झाले होते. यावेळी जंगली महाराज मंदिरात संभाजी भिडे यांनी धारकर्‍यांना (स्वयंसेवकांना) संबोधित केले. यावेळी मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, संभाजी भिडे यांनी पालखीत सहभागी होऊ नये, अशी नोटीस पोलिसांनी बजावली होती. मात्र, त्यांनतरही संभाजी भिडे यांनी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत पालखीचे सारथ्य केले. सलग दुसर्‍या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य भिडे गुरुजी यांनी केले. संभाजी भिडे यांच्यासोबत पालखीत सहभागी झालेल्या त्यांच्या समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी केली.