Sun, Sep 22, 2019 22:04होमपेज › Pune › भीमा कोरेगाव : भिडे गुरूजींसह एकबोटेंविरुद्ध गुन्हा दाखल

भीमा कोरेगाव : भिडे गुरूजींसह एकबोटेंविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Jan 02 2018 6:41PM | Last Updated: Jan 02 2018 6:41PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथील दंगल घडवून आणल्याच्या आरोपावरून शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी आणि हिंदू जनजागरण समिती प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पिंपरी पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदी कायदा या कलामाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तपासासाठी शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी अनिता रविंद्र साळवे (३९, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिलेली आहे. 

दरम्यान, भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. शहरातील विविध भागांत ‘रास्ता रोको’ करून तसेच व्यापार्‍यांची दुकाने बंद करून निषेध करण्यात आला. पिंपरी चौकात येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणार्‍या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच पिंपरी चौकात सुमारे चार तास ‘रास्ता रोको’ करून निषेध नोंदवण्यात आला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.