Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Pune › श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन

Published On: Jul 07 2018 4:36PM | Last Updated: Jul 07 2018 7:01PMपुणे : प्रतिनिधी

डोईवर तुळशीवृंदावन, हाती टाळ त्यास मृदुंगाची साथ, मुखी अखंड हरीनामाचा जयघोष करीत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या संगे, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यनगरीत आगमन झाले. यंदा वारीनिमित्ताने श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी तर्फे माऊलींच्या पालखी मार्गांवर स्वच्छ वारी-सुंदर वारीचा  संदेश देणयात आला.

संत ज्ञानेश्‍वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात व संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामास असून, पुढील मार्गाकडे प्रस्थान असणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले. दहिभाताचा नैवेद्य दाखविल्यानंतर दोन्ही पालख्यांचे मंदिरांच्या सभामंडपात स्थानापन्न झाल्या. समाज आरती होऊन, पालख्यांच्या दर्शनाकरीता दर्शनबाऱ्या खुल्या करण्यात आल्या.

तत्पूर्वी वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते. पालखी दर्शनाकरिता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्‍वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.

पाऊले चालती पंढरीची वाट.., या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला.., विठ्ठल विठ्ठल जयहारी.., देव विठ्ठल, तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.., माझे माहेर पंढरी आहे.. यांसारख्या अभंगांच्या ध्वनी, फडफडणार्‍या भगव्या पताका... कपाळी टिळा, डोक्यावर तुळशी वृदांवन, मुखी विठ्ठल नामाचा गजर, रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि ओसंडून वाहनारा आबाल वृद्धांचा आनंद, आशा भक्तीमय वातावरणात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शनिवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यानगरीत आगमण झाले. पुण्य हे नगर ! जाहला भक्तीचा जागर! अवतरला महासागर ! वैष्णवांचा !! या ओवीचा जणू साक्षात्कारच यावेळी पुणेकरांना अनुभवला. 

Image may contain: one or more people, crowd, sky, tree and outdoor

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी असलेल्या रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथांचे आगमण सायंकाळी पाचच्या सुमारास वाकडेवाडी चौकात झाले.   होताच उपस्थितांनी एकच हरीनामाचा जयघोष करत पालखीचे व वारकर्‍यांचे स्वागत केले. 

 

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

महापौरांच्या हस्ते पालखीस पुष्पहार 

महापौर मुक्ता टिळक यांनी पालखीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी आमदार विजय काळे, नगरसेवक अदित्य माळवदे, नगरसेविका स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, शिल्पा  भोसले उपस्थित होते. पालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीप्रमुखांचा आणि विणेकर्‍यांना श्रीफळ व बिया आणि महिलांना तुळस देऊन सन्मान करण्यात आला.  

आदर्शवत स्वयंशिस्तीमध्ये वारकरी अभंग म्हणत टाळ-मृदंगांच्या गजरात आनंदाने नाचू-डोलू लागले होते. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या दिंड्या सकाळपासूनच पुण्यनगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. पालखी मार्ग दुपारनंतर वारकर्‍यांच्या आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. लाखोंच्या संख्येने भक्तगण तुकोबाच्या दर्शनासाठी डोळे लावून बसले होते. पालखी शहरात दाखल होताच पुणेकरांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रथातील तुकोबाची पालखी आणि त्यातील पादुका डोळ्यांना दिसल्या आणि भाविक कृतकृत्य झाले. काहींनी पादुका दर्शनाचे भाग्य लाभले.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुबंड उडाली. यावेळी सर्वांनाच धन्यत्वाची अनुभुती घेता आली. वारकर्‍यांचा हा भक्तीप्रवाह संचेती चौक, फग्युर्सन रस्त्यामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक मार्ग मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघाला. 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

वरुन राजाची दांडी

गेली दोन दिवसापासून शहरात वरुणराजा हजेरी लावत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारीही वरुणराजा हजेरी लावून पालखीसह जलाभिषेक घालेल आणि या जलाभिषेकाने वारकरी ओले चिंब होतील, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र पालखीच्या अगमणावेळी वरुणराजाने दांडी मारली. मात्र  वरुणराजाने दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणात पुणेकर भक्तमंडळींनी घराबाहेर पडून उत्सही आणि भक्तीमय वातावरणात पालख्याचे स्वागत केले. 

Live Update : 

शेकडो धारकऱ्यांकडून भजन, अभंगाचे गायन, 

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट चौकात आगमन 

पालिका प्रशासन व पुणेकरांकडून पालखीचे टाळ्यांच्या गजराज स्वागत

पादुकांचे चौकात आगमन 

Image may contain: one or more people

पुण्यात चिमुकले विठ्ठल रखुमाई अवतरले 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

कर्णबधीर मुलांनी देखील वारीत सहभाग नोंदवत वारीची शोभा वाढवली 
Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

संत तुकाराम महाराज पालखीचे पाटील इस्टेट चौकात आगमन

 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

नोटिसीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणार, संभाजी भिडे जंगली महाराज मंदिरात दाखल

Image may contain: 4 people

संत तुकाराम महाराजांच्या अश्वाचे वाकडेवाडी चौकात आगमन

Image may contain: one or more people, crowd and outdoor

Image may contain: one or more people, crowd and outdoor

वाकडेवाडी चौकात भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पुण्यात येणारे सर्व रस्ते भक्तीमय झाले आहेत.

Image may contain: 5 people, hat

 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

Image may contain: 1 person, sitting and outdoor

Image may contain: 3 people, people smiling, crowd and outdoor

Image may contain: 1 person, smiling, standing, sky and outdoor