होमपेज › Pune › 'जम्‍मू काश्मीरला मी माझ्या शिक्षणासाठी गेले होते'

'जम्‍मू काश्मीरला मी माझ्या शिक्षणासाठी गेले होते'

Published On: Feb 05 2018 7:46PM | Last Updated: Feb 05 2018 7:46PMपुणे : प्रतिनिधी

मी जम्मू काश्मीरमध्ये शिक्षणासाठी गेलेली होते. माध्यमांमधील माझ्यासंदर्भातील बातम्या पाहून मी स्वत: पोलिसांकडे गेले होते. पोलिसांनी व विविध तपास यंत्रणांनी माझी चौकशी करून मला सोडून दिले असल्याची माहिती चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सादिया शेख हिने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

यावेळी सादिया हिने माझ्या भूतकाळाचा परिणाम वर्तमान व भविष्यावर होत असल्याचेही तिने सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये संशयावरून चौकशी करण्यात आलेल्या पुण्यातील अठरा वर्षीय तरुणी सादिया शेख हिने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.