Tue, Sep 17, 2019 22:42होमपेज › Pune › मराठीला अभिजात दर्जा न मिळणे दुदैव; रंगनाथ पठारे यांची खंत

'मराठीला अभिजात दर्जा न मिळणे दुर्दैव'

Published On: Aug 21 2019 2:33PM | Last Updated: Aug 21 2019 2:33PM
पुणे : प्रतिनिधी

इतर भाषेच्या तुलनेत मराठी भाषेचा मसुदा झालाय तो उत्तमच आहे. मात्र दर्जा बहाल करण्याचे काम शासकीय पातळीवर पुढे जात नाही. ही अत्यंत दुदैवी बाब आहे. अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पठारे यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.       

पठारे म्हणाले, गंभीर आणि मोठ्या लेखनासाठी संयम लागतो. मात्र वृत्तपत्रातील लिखाण लेखकाला संकूचित करते. प्रसिद्धी लेखकाला बोनसाय बनविते. त्यामुळे बोनसाय व्हायचे की वटवृक्ष हे लेखकांनी ठरवले पाहिजे. सर्वसामान्य भितीच्या सावटाखाली आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वृत्तपत्रांनी निर्भय राहणे आवश्यक आहे. लोक बदल आहेत, त्याचा परिणाम जगण्यावर होतो. आपण विनाशाच्या कटड्यावर उभे आहोत. हा धोका समुदायाने ओळखला  पाहिजे.      

मराठी प्राचीन भाषा आहे ती जपली पाहिजे. भाषावार प्रांत रचनेने नुकसान केले. मराठीचा विस्तार टिकविणे आवश्यक आहे. आपल्या विविध बोलीचे सामर्थ्य आहे. दर्जा मिळाल्यास त्यावर अधिक काम करता येईल. मातृभाषेच्या बाबतीत आपण आत्मविश्वास गमावला आहे. राष्ट्रवाद एका मर्यादेनंतर विचाराचा संकोच करणारी गोष्ट आहे. त्याने नुकसान झाले आहे. भिंती बांधून स्थलांतर थांबणार नाही, ते होतच राहणार आहे. वंशवादी राष्ट्रवादाने प्रखर वाचार आणले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex