Tue, Apr 23, 2019 23:51होमपेज › Pune › रुपी बँकेचे ठेवीदार, कर्मचारी संघटना यांचा सोमवार धडक मोर्चा

रुपी बँकेचे ठेवीदार, कर्मचारी संघटना यांचा सोमवार धडक मोर्चा

Published On: Jan 13 2018 6:49PM | Last Updated: Jan 13 2018 6:48PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी

रुपी बँकेचे ठेवीदार व कर्मचारी संघटना सोमवार, दि १५ रोजी सकाळी १० वाजता सहकार आयुक्त कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, येथे मोर्चाद्वारे आपल्या मागण्या सादर करणार आहेत. 

पुढारी प्रतिनिधीबरोबर बोलताना पुणेकर नागरी कृती समितीचे अध्यक्ष मीहीर थत्ते यांनी यावेळी या आंदोलनात सर्व ठेवीदार खातेदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या सर्वांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळावेत, यासाठीच हे आंदोलन आहे. थकबाकीदार कर्जदार, भ्रष्ट संचालक व अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी, रुपी बँकेचे त्वरित मोठ्या बँकेत विलीनीकरण व्हावे ही प्रमुख मागणी आहे. याबाबतचे निवेदन  सहकार आयुक्त विजय झाडे यांना देण्यात येणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात भाजपने रुपी बँकेचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. सध्या भाजप सरकारची चार वर्ष पूर्ण होत असतानासुद्धा सदर आश्वासनाची पुर्ती करण्यात ते अपयशी ठरले आहे. अंदाजे सात लाख खातेदारांचा जीव टांगणीला लागलेला असताना भाजपच्या सरकारला या खातेदारांचे काहीही एक सोयर सुतक नसल्याचा आरोप थत्ते यांनी केला.

या धडक मोर्चानंतर पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने धडक मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन मीहीर थत्ते यांनी केले.