Tue, Apr 23, 2019 14:25होमपेज › Pune › ‘भूताच्या बांगड्यांचा आवाज’ भोवला 

‘भूताच्या बांगड्यांचा आवाज’ भोवला 

Published On: Mar 17 2018 6:14PM | Last Updated: Mar 17 2018 7:24PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरीतील येथील दुरुस्तीकाम सुरु असलेल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत असल्याचे सांगत अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या चौघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.  यामध्ये ठेकेदार आणि तीन कामगारांचा समावेश असून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे नाट्यगृहात ‘भूताच्या बांगड्यांचा आवाज येतो’ अशी अफवा पसरवणाऱ्यांना हा आवाजच भोवला असे म्हणावे लागेल. 

याप्रकरणी मांत्रिक (कामगार) अमर गोवर्धन चौधरी (५१, रा.दिघी रोड भोसरी), शशिकांत गणेश चौहान (३५, रा.भोसरी) आणि अरूण अनुप्रसाद चौहान (५१, रा.भोसरी) आणि ठेकेदार आनंद निर्मलसिंग गील (३२, रा.निगडी प्राधिकरण) या सर्वांना अटक केली आहे. या चौघांना न्यायलायय हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर श्रीकांत कुमार हा कामगार फरार आहे त्याचा शोध सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहाचे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. एका कोपर्‍यात काम सुरू असताना, एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा आणि तिच्या बांगड्यांचा आवाज होत असल्याचा भास काही कामगारांना झाला होता. त्यामुळे तेथे भूत असल्याच सांगत तेथून सर्व कामगारांनी पळ काढला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याच कामगारामधील एकाने नाट्यगृहात विधिवत पूजाअर्चा केली आणि पुन्हा बंद झालेले काम सुरू केले. या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलिस करत आहेत. 
 

Tags : Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad news, ghost rumors, ghost in acharya atre theater, drama theater, theater in pimpri - chinchwad, cultural activity,