Wed, Apr 24, 2019 00:07होमपेज › Pune › पिंपळे निलखमध्ये साडेआठ लाखांची चोरी

पिंपळे निलखमध्ये साडेआठ लाखांची चोरी

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपळे निलख येथे राहणार्‍या निवृत्त अभियंत्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (ता.13) दुपारी घडली. विशाल गोवर्धन पटेल (वय 32, रा. द्वारकामाई वंडर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विशाल पटेल यांचे मामा अरुण पाटील हे गंगोत बंगला, गोविंद व्हिला, गुलमोहर कॉलनी, विशालनगर, पिंपळे निलख या ठिकाणी राहतात. पाटील हे अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. जानेवारीमध्ये विशाल यांचे मामा पाटीळ हे अमेरिकेला गेले. यामुळे विशाल हे कधीतरी मामाच्या घरी येत-जात असे. 3 ते 13 एप्रिल  दरम्यान विशाल यांच्या मामाचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील 17 तोळे सोने, दोन किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, असा एकूण आठ लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. 

Tags : Pune, Pimpri, robbery,  pimple nilakh, over, 8 ,lakh, rupees, robbed