Tue, Oct 22, 2019 02:46होमपेज › Pune › ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:21AM

बुकमार्क करा
पुणे :  प्रतिनिधी 

महादेवनगर-मांजरी रस्त्यावर ट्रकचा धक्का लागून खाली पडलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जुन्या कालव्याशेजारी घडला. 

सौरभ दिलीप टिळेकर (वय 22, रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभच्या उभ्या असलेल्या दुचाकीला पंधरा नंबर येथे दुसर्या दुचाकीने सकाळी धडक दिल्याने नुकसान झाले होते. त्याची दुरुस्ती करण्यासाठी तो ढेरे बंगल्याजवळील गॅरेजवर गेला होता. दुचाकी दुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा महादेवनगर येथील आपल्या घरी येत होता. त्याच वेळी मांजरीकडून येणार्या ट्रकचा धक्का लागून तो खाली पडला. ट्रकचे मागील चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सौरभ येवलेवाडी येथील सिंहगड  इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. हडपसर पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19