Thu, Jan 17, 2019 16:56होमपेज › Pune › फोटो शेअर करण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

फोटो शेअर करण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

Published On: Mar 06 2018 12:20PM | Last Updated: Mar 06 2018 1:06PMपिंपरी : प्रतिनिधी

अश्‍लिल फोटो नातेवाईकांना दाखवण्याची आणि सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत एका २५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांत दाखल झालेला गुन्हा ‘झिरो नंबर’ने हिंजवडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघेजण फरार आहेत. 

जितेंद्र तुरीया आणि अजेश तिवारी या दोघांना अटक केली आहे. अजेश तिवारी हा कंपनीतील सुपरवायझर असून पीडित महिलेचा गैरफायदा घेत त्याने आणि त्याच्या इतर सहकार्‍यांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही बावधन परिसरात राहते. ती हिंजवडी येथील एका कंपनीत ‘हाऊसकिपींग’चे काम करते. काही दिवसांपूर्वी या महिलेला पैशाची आवश्यकता असल्याने तिने अजेश तिवारी याच्याकडे पैसे मागितले. त्याने पैसे देण्याच्या आमिषाने तिला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने तिचे नग्नावस्थेतील फोटो काढले. हे  फोटो दाखवून तिला धमाकवले जात होते. 

तसेच त्याच्या इतर साथीदारांनीही तिच्यासोबत बलात्कार केला. कात्रज, बावधान आणि मारूंजी येथील जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.