Fri, Jul 03, 2020 03:06होमपेज › Pune › पाच वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार

संतापजनक; अल्पवयीन मुलांकडून चिमुरडीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

Published On: Dec 22 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 2:06AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, पुण्यात आठ वर्षीय चिमुकलीवर सहा अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, यातील एक आरोपी केवळ 6 वर्षे 9 महिन्याचा आहे. दुसरा 9 वर्षे, अन्य दोघे 10 वर्षे आणि आणखी एक 2 वर्षाचा आहे, तर एकजण 18 वर्षांचा आहे. या प्रकरणी सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार सुरू आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अल्पवयीनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरातील आहेत. दोन दिवसांपासून  मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिला वडिलांनी रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांना याबाबत शंका आली. त्यांनी विचारपूस केली, मात्र मुलीने काही सांगितले नाही. डॉक्टरांनी पालकांना तिच्याकडे विचारपूस करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या आई व इतर नातेवाईकांनी विश्‍वासात घेऊन विचारले. त्यावेळी तिने खेळण्यासाठी म्हणून, सहा जण इमारतीच्या टेरेस तसेच घरी घेऊन जात असत. त्याठिकाणी नेऊन अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती दिली.

त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते; मात्र पोलिसांनी तात्काळ सहाही मुलांना ताब्यात घेतले. हा प्रकार गेल्या चार महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर ते 21 डिसेंबर 2017 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.