Sun, Aug 25, 2019 23:49होमपेज › Pune › तरुणीचे अपहरण करून बलात्कार

तरुणीचे अपहरण करून बलात्कार

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:13AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पायी जाणार्‍या तरुणीचे अपहरण करून, तोंडाला रुमाल बांधून, बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च ते एप्रिलदरम्यान निगडी, प्राधिकरण येथे घडला आहे.

पीडित तरुणीची प्रसूती झाली आहे. निगडी पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 22 वर्षांची असून, ती दुपारी प्राधिकरण परिसरातून पायी जात होती. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असणार्‍या एका गाडीमध्ये एक जण होता, तर गाडीबाहेर एक जण उभा होता. त्या दोघांनी तिला बळजबरीने गाडीत घातले व तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध केले. तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले व त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती आकुर्डी येथील रेल्वे पुलाखाली होती. ती कशीबशी तिच्या घरी गेली. 

काही दिवसांनी तिला त्रास सुरू झाल्यानंतर ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाली असून, तिने घरच्यांच्या मदतीने निगडी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.