Tue, Feb 18, 2020 00:24होमपेज › Pune › घोरपडी रेल्वेस्थानक परिसरात तरुणीवर बलात्कार

घोरपडी रेल्वेस्थानक परिसरात तरुणीवर बलात्कार

Published On: Sep 20 2019 1:51AM | Last Updated: Sep 20 2019 1:47AM
पुणे : प्रतिनिधी
घोर्वे स्टेशन परिसरात एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंदाजे 25 वर्षीय तरुणावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईबरोबर भांडण झाल्याच्या कारणातून ही तरुणी घराबाहेर पडली होती. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कारणातून  पीडित तरुणीचे तिच्या आईबरोबर भांडण झाले. त्यामुळे (दि.18) बुधवारी सायंकाळी तरुणी घराबाहेर पडली होती. 

त्यानंतर रागाच्या भरात ती बंगळुरूकडे जाणार्‍या एक्सप्रेसमध्ये बसली. मात्र, तिकीट चेकरने (टी.सी.) तरुणीकडे तिकिटाची विचारणा केली. तेव्हा तिच्याजवळ तिकीट नसल्यामुळे चेकरने (टी.सी.) तिला कराड रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगितले. त्यानुसार पीडित तरुणी कराड रेल्वे स्थानकात उतरून परत पुण्याकडे येणार्‍या पॅसेंजर गाडीत बसली. घर सोडल्यापासून बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत काही खाल्‍ले नसल्यामुळे तिला प्रचंड अशक्‍तपणा आला होता. त्यामुळे तिला चक्‍कर येत होती. या वेळी पॅसेंजरमध्ये  एक युवक तिला भेटला. 

तरुणीला विश्वासात घेत त्याने तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगत तिला घोरपडी स्थानकात उतरण्यास भाग पाडले. त्यानुसार तरुणावर विश्वास ठेवून पीडित तरुणी घोरपडी स्थानकात उतरली. तेव्हा येथील रेल्वे रुळाजवळ असलेल्या एका छोट्या खोलीत नेऊन या आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तरुणीला  घोरपडी रिक्षा स्टँडवर आणून सोडल्यावर आरोपी पसार झाला. पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.