होमपेज › Pune › नातेवाईकाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार

नातेवाईकाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: Jan 12 2018 10:23AM | Last Updated: Jan 12 2018 10:23AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

घरात एकटी असल्याचा फायदा घेत आणि आईला जीवे मारण्याची धमकी देत एका ४८ वर्षीय नातेवाइकाने १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हा प्रकार जुलै २०१७ ते १० जानेवारी २०१८ दरम्यान सांगवी येथे घडला. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.