Sun, Aug 18, 2019 15:22होमपेज › Pune › अल्पवयीन मुलीवर चुलत चुलत्याचा बलात्कार

अल्पवयीन मुलीवर चुलत चुलत्याचा बलात्कार

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

शेजारी राहणार्‍या 45 वर्षीय चुलत चुलत्यानेच जिवे मारण्याची धमकी देऊन 14 वर्षाच्या मुलीवर वर्षभर बलात्कार केल्याची घटना सांडभोरवाडी (तिन्हेवाडी, ता. खेड) येथे घडली. या प्रकरणी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असून, पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलीचे आईवडील रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शाळेला सुटी असल्यावर ही मुलगी घरात एकटी असायची. आरोपी टीव्ही पाहायच्या नावाखाली घरात जाऊन बराच वेळ बसायचा, कधी झोपायचा. जवळचे नाते आणि शेजारी असल्याने कोणीही आक्षेप घेतला नाही. एकेदिवशी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. मुलीला मारहाण करून आणि जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. भीतीपोटी मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्याचा गैर फायदा घेत नराधम चुलत्याने  वर्षभर अनेकदा बलात्कार केला. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. आठ दिवसांपूर्वी पोटात दुखू लागल्यावर पालकांनी तिला दवाखान्यात आणले. त्यावेळी ही बाब समोर आली. गुरुवारी (दि. 31) खेड पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.