Thu, Mar 21, 2019 11:36होमपेज › Pune › गुंगीचे औषध देऊन मराठी अभिनेत्रीवर बलात्कार 

गुंगीचे औषध देऊन मराठी अभिनेत्रीवर बलात्कार 

Published On: Sep 11 2018 7:02PM | Last Updated: Sep 11 2018 7:02PMपुणे : प्रतिनिधी 

आगामी मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या चित्रपटाच्या संकलकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश एस. एन. सिरसीकर यांनी त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यावर बलात्कार, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

समीर नाथा चौधरी (२७, स्वराज चौक, लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक मुळ रा. वरूडे, राजगुरूनगर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय अभिनेत्रीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ डिसेंबर २०१७ ते ३ सप्टेंबर दरम्यान साईदीप लॉज येथे घडला. 

चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान चौधरी याची सिनेमाच्या मुख्य अभिनेत्री बरोबर ओळख झाली. त्याने तिला चित्रपटा संदर्भात बोलण्याच्या बहाण्याने साईदीप लॉज येथे बोलवून घेतले. तेथे त्याने तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्याचे चित्रीकरण त्याने त्याच्या मोबाईल मध्ये केले. दरम्यान, पीडितेचा विवाह ठरलेला असल्याचे माहिती झाल्यानंतर चौधरीने तिच्या होणार्‍या पतीला व्हिडीओ कॉल करून संगणकावरील अश्‍लिल चित्रीकरण दाखवून ते व्हायरल केले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर चौधरीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी पोलिस कोठडीची मागणी करताना सांगितले की, गुंगीचे कोणते औषध दिले, त्याने त्याच्याकडील मोबाईल व्यतिरिक्त कोणत्या मोबाईलचा वापर केला का? ज्या संगणकावरून व्हिडीओ दाखविण्यात आला आहे. तो संगणक जप्त करायचा आहे. त्याने अश्‍लिल चित्रीकरणाचे व्हिडीओ कोणाला व्हायरल केला याचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली.