Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Pune › पुणेः भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

पुणेः भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

Published On: May 05 2018 10:03AM | Last Updated: May 05 2018 10:06AMपुणेः प्रतिनिधी 

भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर २० वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी भिमा नागप्पा कांबळे याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमा हा तीन वर्षांच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यास कुटुंबातील सर्वांचा खून करण्याची धमकी त्याने दिली. या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. याप्रकरणी भैय्यासाहेब महादेव फंदे (२१, रा. जगताप नगर, थेरगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.४) दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी यांची दोन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. फिर्यादी यांच्या पत्नीचे लक्ष नसल्याचे पाहून फंदे याने मुलीचा विनयभंग केला. तपास वाकड पोलिस करत आहेत.

Tags : rape, 3 year old minor girl, bhosari, pune news, threatened, family, kill, police