Wed, Nov 21, 2018 01:04होमपेज › Pune › पुणे : युवतीवर अत्याचार करून  धारदार शस्त्राने प्रियकराकडून वार 

पुणे : युवतीवर अत्याचार करून  धारदार शस्त्राने प्रियकराकडून वार 

Published On: May 17 2018 11:51AM | Last Updated: May 17 2018 11:51AMपिंपरी : प्रतिनिधी 

जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर अल्‍पवयीन प्रेयसीने बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथे सोमवारी (ता.१४) रात्री घडली. या प्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

शाहरुख रफिक शेख (२२, रा. आदर्शनगर, काजळे पेट्रोल पंपाच्या मागे, मोशी) या युवकाला अटक केली आहे. याप्रकरणी सतरा वर्षीय युवतीने भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख याने पीडित युवतीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे त्या युवतीने शाहरुख याच्याशी बोलणे बंद केले. या कारणावरून चिडलेल्या शाहरूखने सोमवारी रात्री युवतीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ केली, तसेच युवतीला घराबाहेर ओढत आणून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. 

या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करीत आहेत.