Sat, Jan 19, 2019 00:23



होमपेज › Pune › बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:35PM

बुकमार्क करा




पिंपरी : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीच्यावेळी स्वतःच्या सोळा वर्षाच्या मुलीसोबत लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.

याप्रकरणी सोळा वर्षाच्या मुलीने फिर्याद दिलेली आहे. तर 42 वर्षीय नराधम बापास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेली दोन महिन्यांपासून रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपल्यानंतर नराधम बाप जबरदस्तीने मुलीवर अत्याचार करत होता. तसेच विरोध केल्यास मारहाण करुन शिवीगाळ करत होता. 

चार जानेवारी रोजी रात्री पिडीत मुलीच्या भाऊ झोपला असतानाही नराधमाने जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर आईने आणि भावाने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर निगडी पोलिसांनी नराधमास अटक केली आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.