Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Pune › रांजणगावमधील वाघाळेमध्ये वाद सोडविताना वृद्धेचा मृत्यू 

रांजणगावमधील वाघाळेमध्ये वाद सोडविताना वृद्धेचा मृत्यू 

Published On: Dec 21 2017 1:56PM | Last Updated: Dec 21 2017 1:50PM

बुकमार्क करा

रांजणगाव गणपतीः वार्ताहर

वाघाळे (ता. शिरुर) येथे घरगुती भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा छातीत दगड लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी राञी साडे आठच्या सुमारास घडली.

बानाबाई भाऊ बरकडे (वय ७०) असे मृत महिलेचे नाव असुन संशयित अशोक देवराम बरकडे याने हे कृत्य केले आहे. या भांडणामध्ये  दादाभाऊ बाचकर हा देखील जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला व आरोपी हे दोघे ही पळशी (ता. पारनेर) येथील रहिवासी असून ते वाघाळे येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. या मृत महिलेचे पोलिसांनी शिरुर येथील सरकारी रुग्णालयात  शव विच्छेदन केले असून दगड लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.