Sat, Jun 24, 2017 10:43
25°C
  Breaking News  

होमपेज › Pune › विरोधकांनी कोविंद यांच्या नावाला पाठींबा द्यावा- रामदास आठवले

विरोधकांनी कोविंद यांच्या नावाला पाठींबा द्यावा- रामदास आठवले

By | Publish Date: Jun 21 2017 3:42PM

पुणे : प्रतिनिधी 

दलित समाजातील व्यक्ती 'एनडीए'ची राष्ट्रपतीपदाची उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी सर्व विरोधकांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठींबा द्यावा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रामनाथ कोविंद हे आंबेडकरी विचारांना मानणारे आहेत. ते अभ्यासू आणि मनमिळावू आहेत. त्यामुळे कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घोषित होणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

मोदी सरकारविषयी दलित जनता समाधानी 

केंद्र सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दलित जनता सकारात्मक आहे. इंदू मिल, आंबेडकर स्मारकाची घोषणा सरकारने केली आहे. शिवाय लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करत असलेले घर केंद्र सरकारने विकत घेतले आहे. त्यातच आता राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो असेही आठवले म्हणाले.