Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Pune › मावळ धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

मावळ धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 11:14PMवडगाव मावळ : मावळ तालुक्यात धनगड जातीचे किती लोक राहतात, त्यांची नावे व पत्ते द्यावेत तसेच किती जणांना धनगड जातीचे दाखले दिले आहेत, यासंदर्भात माहिती मिळावी यासाठी आज मावळ तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये धनगर समाजाचे पदाधिकारी दर्शन गुंड, भरत कोकरे, बबनराव खरात, भाऊसाहेब आखाडे, पांडुरंग कोकरे, नामदेव शेडगे, रवींद्र कोकाटे, रामदास मरगळे, संजय कोकरे, गंगाताई कोकरे, अनिता धायगुडे आदी सहभागी होते.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भारत ठाकूर, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनीही मोर्चात सहभागी होवून आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात राहत असलेल्या धनगड जातीच्या लोकांची नावे व पत्ते याची माहिती द्यावी अन्यथा ते राहत नसतील तर एकही धनगड जातीची व्यक्ती तालुक्यात राहत नसल्याबद्दल दाखला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.