Fri, May 29, 2020 03:54होमपेज › Pune › खा. राजू शेट्टी यांचे दगडू शेठला साकडे (video)

'बाप्‍पा पुढच्‍या आंदोलनास यश दे'(video)

Published On: Jul 21 2018 1:11PM | Last Updated: Jul 21 2018 1:16PMपुणे :  प्रतिनिधी   

             
केंद्र  सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. तरी शेतकऱ्यांचे 145 रुपये काढून घेतले आहे. साडे नऊ टक्क्यांऐवजी 10 टक्के मूलभूत उतारा केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 2019 मध्ये शेतकरी औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार  नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.              

 सरकारने दुधाच्या शेतकऱ्यांना थेट पाच रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर खा. शेट्टी यांनी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. ठरलेल्या निर्णयाची  अंमलबजावणी दूध संघांनी करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये कुचराई केल्यास गणपतीच्या सणावेळी दूध मिळणार नाही, अशी व्यवस्था स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच त्‍यांनी पुढच्‍या सर्व आंदोलनांस असेच यश देण्‍याची प्रार्थना गणपती बाप्‍पाकडे केली.