Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Pune › ....तर अनेक एम एफ हुसेन तयार होतील : राज ठाकरे

....तर अनेक एम एफ हुसेन तयार होतील : राज ठाकरे

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 1:02PMपुणे : प्रतिनिधी

नवोदित कलाकारांना प्रदर्शन भरविण्यासाठी जागा मिळत नाही. या प्रदर्शनाद्वारे नावाजलेल्या कलाकारांसोबत आज नवोदित कलावंतांना जागा मिळते आहे. ही उत्तम आणि योग्य गोष्ट आहे. एम एफ हुसेन यांचं करिअर हे वयाच्या साठाव्या वर्षी बहरात आलं. अनेक नामवंत कलाकारांसोबत नवोदितांचे चित्र लागतील तर अनेक एम एफ हुसेन समोर येतील, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदनतर्फे पुणे आर्ट पुणे हार्ट या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, माजी प्राध्यापक नरेंद्र विचारे, महेश साळगावकर, केतन धोत्रे, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, विजय महामुलकर उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र विचारे म्हणाले, चित्रकले बद्दल जनजागृती करायची असल्यास प्रदर्शन आयोजित करणे महत्वाचे आहे. राज साहेबांकडे दोन दोन विद्यापीठ होती. एक कलानगर ला आणि एक दादरला. कलानगरला त्यांचे वडील होते आणि दादरला बाळासाहेब. तिथूनच त्यांना बाळकडू मिळाले. त्यामुळे, आर्ट स्कुलला प्रवेश घेण्याची त्यांना गरजच नव्हती.