Fri, Apr 26, 2019 03:34होमपेज › Pune › पुणे : पावसाळी पर्यटन

पुणे : पावसाळी पर्यटन

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 1:34AM लोणावळा

अंतर : पुण्यापासून  रेल्वेने अंतर 64 किमी  व रस्त्यावरून  68 किमी 
वेळ - रेल्वेने 45 मिनिटात पोहोचता येते. बस किंवा गाडीने सव्वा दोन तासात पोहोचणे शक्य 
साधने - पुण्यातून रेल्वे , बस उपलब्ध. स्वत:ची गाडी नेऊ शकतात. रस्ता उत्तम आहे. 
आकर्षण - पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय ठिकाण. पावसाळ्यात तर याठिकाणी तीनचार महिने मोठी गर्दी असते. हिरवीगार झाडे, निसर्गशोभा, डोंगरमाथे व दर्‍या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे यांमुळे येथे पावसाळ्यात जाणे आनंददायी अनुभव ठरतो.

येथील मुख्य आकर्षण -  राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वत्र प्रसिद्ध आहे.

 लवासा

अंतर : पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
वेळे :  दोन ते अडीच तासात पोहोचणे शक्य 
साधने : दुचाकी, चारचाकी अथवा कॅबने जाणे सोयीचे 

आकर्षण : भारतातील पहिले योजना आखून निर्माण केले गेलेले, डोंगरांच्या मध्यभागी वसवलेले असे हे पर्यटन स्थळ आहे. पावसाळयात कुटुंबासह जाण्यासाठी एक परिपुर्ण ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. 25 एकरात वसवलेले हे एक सुंदर छोटेसे शहरच आहे. याठिकाणच्या रस्त्यांवरून पायी फिरणे हा एक सुखद अनुभव असतो. छायाचित्रणासाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. हिरव्यागार लँडस्केपसह सात टेकड्यांमधून वसवलेल्या या ठिकाणाला आवश्य भेट द्यायला हवी. 

 वरंधा घाट 

अंतर : सुमारे 82 किमी 
वेळ  : दीड ते दोन तासात पोहोचता येते.
साधने - स्वत:च्या वाहनाने जाणे हा उत्तम पर्याय 

आकर्षण : पुण्याहून भोर महाडकडे जाताना वरंधा घाटाचा रस्ता 20-25 किलोमीटर लांबीचा आहे. हा घाट सह्याद्रीच्या लगत उभ्या असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून  कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासांची शिवथरघळ आहे. मोठे डोंगर, निसर्ग येथे अनुभवायला मिळतो.  पावसाळ्यात येथे  असंख्य धबधबे कोसळत असतात. सकाळी पहाटे निघून एका दिवसत हा परिसर फिरता येतो.

 मोराची चिंचोली 

अंतर : 54 किमी शहरापासून 
वेळ : 1 तासात आरामात पोहोचता येते.
साधने :  बस उपलब्ध आहेत. याशिवाय रस्ते चांगले असल्यामुळे दुचाकी, चारचाकीने ही प्रवास योग्य. 
आकर्षण : मोराची चिंचोली पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूरजवळ आहे. अहमदनगर मार्गालागताच डाव्या बाजूस शिक्रापूर फाट्यावरून आत सुमारे 23 कि.मीवर हे  मोरांचे गाव वसलेले आहे. या ठिकाणी विपूल प्रमाणात वनसंपदा आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पावसाळी वातावरणात पहायला जाण्यासाठी पर्यटकांची या स्थळाला जास्त गर्दी होते.

 पानशेत
अंतर : शहरापासून 40 किमी अंतरावर 
वेळ : साधारण 1 तासात पोहोचता येते.
साधने : दुचाकी, चारचाकी ने जाणे लोक पसंत करतात. बसही उपलब्ध 

आकर्षण -पुण्याला पाणीपुरवठा ज्या ठिकाणाहून होतो असे पाणशेत धरण आणि बाजूचा परिसर पावसाळ्यात लांबवर हिरवागार दिसतो. आजूबाजूला फुललेली असंख्य  रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे शेतामध्ये शेतकर्‍यांनी केलेली पेरणी असे वातावरण अनुभवायचे  असेल तर पुण्याच्या जवळच असणार्‍या पाणशेत ला आवश्य भेट द्यायला  हवी. येथून जवळच तोरणा किल्ला आहे. पानशेत ला स्वत:च्या वाहनाने जाणार असले तरी हा परिसर पायी फिरण्यात खरी मजा आहे. पावसाळ्यात या परिसरात सगळीकडे फुलणार्‍या पांढर्‍या फुलांचे ताटवे बघणे, आजूबाजूला कोसळणारे धबधबे, डोंगररांगा या सगळ्यांच्या सोबतीने पावसात चिंब भिजण्याची मजा घेण्यासाठी जवळच असणार्‍या पानशेतला पर्याय नाही.