होमपेज › Pune › पिंपरी- चिंचवडमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

पिंपरी- चिंचवडमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:14AMपिंपरी : शहरात मंगळवारी (दि.17) विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला, तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊन शहरवासीयांची तारांबऴ उडाली. 

सोमवारी सायंकाळी पाच वाजेनंतर शहराच्या काही भागात वादळी वारा सुटला तसेच पावसाचा शिडकावा झाला. मंगळवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते.तसेच वातावरणात असह्य उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजेनंतर शहरातील विविध भागात वीजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण नागरीकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला, तसेच काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे शहरातील मुख्य चौकात पावसामुळे वाहतुक मंदावल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपिट उडाली तर बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला. 

मंगळवारी शहराचे किमान तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. बुधवारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून येत्या चोवीस तासात मेघगर्जनेसह पाउस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली. पुढील चोवीस तासात सराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

Tags : Pimpri, rain, accompanied, thundershowers,  Pimpri, Chinchwad