Fri, Jan 18, 2019 20:20होमपेज › Pune › ‘पुरंदर’चा सूत्रधार लवकरच गजाआड

‘पुरंदर’चा सूत्रधार लवकरच गजाआड

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

बोगस पुरंदर विद्यापीठाचा दैनिक ‘पुढारी’ने पर्दाफाश करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरदेखील या विद्यापीठावर कारवाई करण्याचे धाडस होत नव्हते. येत्या सात दिवसांमध्ये या विद्यापीठाच्या सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उच्चशिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे ‘पुरंदर’चा सूत्रधार दादा जगताप लवकरच सरकारी पाहुणा म्हणजेच गजाआड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वायकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी पुरंदर हे विद्यापीठ  बोगस असून येथे कोणीही प्रवेश घेऊ नये, असा शासनाकडून खुलासा करावा, असे आदेश देताना म्हटले आहे. या विद्यापीठाकडून नियमबाह्य पदव्यांची खैरात होत असल्याचे  दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणले होते.