Tue, Jul 23, 2019 10:44होमपेज › Pune › पुणे : विवाहितेची आत्महत्या; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : विवाहितेची आत्महत्या; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 1:17AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून वारंवार  होण्यार्‍या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कॅम्प परिसरातील कांबळे कोचजवळ मंगळवारी (दि. 2) घडली. शाबिया इम्तीयाज कुरेशी (22) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सैफन कुरेशी (31, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत महिलेचा पती इम्तीयाज कुरेशी (24) व इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाबिया कुरेशी हिचे इम्तियाज कुरेशी याच्याशी 2015 मध्ये लग्न झाले होते. ते कॅम्प परिसरातील जाफरीन लेनमधील कांबळे कोच जवळ राहण्यास होते. दरम्यान लग्नापासून तिचा पती आणि  सासरच्या इतर मंडळीने संगनमताने तिच्याकडे हुंड्याच्या पैशांची मागणी केली. त्यासोबतच हुंड्याची मागणी करत तिला वारंवार टोचून बोलणे, तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात मंगळवारी रात्री ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.