Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Pune › महिलांना ब्लॅकमेल करणारा भामटा अटकेत

महिलांना ब्लॅकमेल करणारा भामटा अटकेत

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:20AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेला व्यवसायाचा बहाणा करत तिच्याशी व्हाट्सअ‍ॅपवर अश्‍लील संभाषण व अश्‍लील फोटो पाठवून बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणार्‍या भामट्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. सागर गजानन कोळेकर (28, लोणार गल्ली, विठ्ठल मंदिरासमोर शनिवार पेठ, कोल्हापूर, सध्या जानकी लॉज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक परिसरात ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेला  दीड महिन्यापूर्वी राहुल कुलकर्णी नावाने फोन करून एका अज्ञात व्यक्तीने फोन केला व भागीदारीत ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने संपर्क वाढवला. त्यानंतर महिलेने नकार दिल्यावर व्हाट्सअ‍ॅपवर अश्‍लील भाषेत संभाषण करत अश्‍लील फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देत दहा हजारांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी खडक पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस तपास करत असताना त्याची मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती घेतली. त्यानंतर आरोपी हा शंकरशेठ रस्त्यावरील जानकी लॉज येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. केसकर, सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. पवार, पोलिस नाईक उमेश मानकर, राकेश क्षीरसागर, राकेश क्षीरसागर यांनी तपास करून त्याला अटक केली.