Fri, Apr 26, 2019 03:19होमपेज › Pune › महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

खडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सरकारची फसवणूक करून सरपंच म्हणून निवडून आलेल्या महिलेचा जामीन अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी फेटाळून लावला आहे. 

प्रतिभा महेश मते (38, आझाद हिंद तरुण मंडळाजवळ, खडकवासला गाव) असे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अशोक ऊर्फ तुकाराम लक्ष्मण मते (65, रा. सिंहगड रोड) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

खडकवासला ग्रामपंचायतीची 2012 मध्ये निवडणूक झाली होती. त्या वेळी महिला सरपंचपद हे राखीव  होते. प्रतिभा मते या निवडणुकीत निवडून आल्या. ओबीसी जातीची उमेदवार नसतानाही तिने बनावट कागदपत्रे सादर करून ही निवडणूक लढवल्याची बाब समोर आले. तिचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याबाबत जात पडताळणी विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत मते यांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले. 

त्यानंतर तक्रारदार अशोक मते यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करून प्रतिभा मते हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याचिकेवर निर्णय देताना ÷उच्च न्यायालयाने मते हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तिच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे, ती बनावट कागदपत्रे वापरात आणणे अशा विविध कलमांखाली हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात प्रतिभा मते हिने अटक टाळण्यासाठी न्यायालयात 

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तिच्या जामिनाला विरोध करताना सरकार पक्षाने तिचा जामीन फेटाळून लावण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.