Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › महिलेचा विनयभंग; एकास अटक

महिलेचा विनयभंग; एकास अटक

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 1:22AM

बुकमार्क करा
पुणे ः वार्ताहर

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास मुंढवा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. प्रवीण अरुण कवडे (43, रा. सोपानबागजवळ, घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत  31 वर्षीय महिलेने मुुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने 2012 मध्ये प्रवीण कवडे यास जॉइंट व्हेंचरसाठी उंड्री येथील लिंगराज कानडे यांची एक एकर जमीन कन्स्ट्रक्शनसाठी घेतली होती. त्या कन्स्ट्रक्शनसाठी महिलेने 80 लाख रुपये दिले होते.

त्या बदल्यात कवडे याने महिलेला 30 टक्के नफा देण्याचे कबूल केले होते, परंतु त्याने ते बांधकामदेखील केले नाही. तसेच महिलेचे पैसेही परत केले नाहीत. त्याबाबत महिलेने पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार दिली, तेव्हा कवडे याने पैसे देण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. त्यानंतर महिला पैसे मागण्यासाठी गेली असता पैसे मागू नको नाही तर मारून टाकीन, अशी धमकी दिली.