Wed, Jan 29, 2020 23:30होमपेज › Pune › पुणे : नवले पुलाखाली भीषण अपघात, तरुणी ठार  

पुणे : नवले पुलाखाली भीषण अपघात, तरुणी ठार  

Published On: Dec 29 2017 4:46PM | Last Updated: Dec 29 2017 4:48PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

वडगाव येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाऱ्या सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने तो थेट विश्व आर्केड इमारतीमध्ये असलेल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. स्वाती मधुकर ओरके (वय २९) असे ठार झालेल्‍या तरुणीचे नाव असून ती संगणक अभियंता होती. 

लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सिमेंट घेऊन जाणारा टँकर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजकडून येत होता. त्यावेळी नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक निकामी झाल्याने तो थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या आवारात घुसला. त्यावेळी दोन वाहनांना ठोकरत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सीरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्यावेळी तेथे स्वाती ओरके ही नाश्ता करण्यासाठी आलेली होती. ती टँकरच्या समोरील चाकाखाली अडकली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.