Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Pune › प. महाराष्ट्रातील २८ धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

प. महाराष्ट्रातील २८ धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी 

पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या 39 धरणांपैकी 28 धरणांमध्ये 95 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित 11 धरणांचा पाणीसाठा 3 ते 90 टक्क्यांपर्यंत आहे. राज्यात सर्वात जास्त क्षमता असलेल्या उजनी धरणामध्ये सध्या केवळ 34.87 टक्के, तर कोयना धरणात 95.89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

 भीमा खोर्‍यात एकूण 26 धरणे असून, यापैकी काही मोजक्याच धरणक्षेत्रात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, पवना, पानशेत, खडकवासला, नीरा देवधर, भाटघर या धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर भामा  आसखेड -89.24 टक्के, डिंभे-92.74 ट्क्के, कासारसाई-98.57 टक्के, मुळशी-99.84 टक्के, वरसगाव -95.72, वीर 92.14 टक्के एवढी भरलेली आहेत. पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास या धरणांमधील पाणीसाठा 100 टक्के होईल. उर्वरित धरणक्षेत्रात पावसाने अजूनही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पिंपळगाव जोगे- 8.01, माणिकडोह-48.10, येडगाव-66.14, वडज-63.82, घोड-23.44, विसापूर-7.15, टेमघर-57.93, गुंजवणी-73.01, नाझरे-3.07 उजनी 34.87, चिल्हेवाडी-73.04 टक्के  एवढा कमी पाणीसाठा जमा झालेला आहे .

कृष्णा खोर्‍यात 13 पैकी 12 धरणामधील पाणीसाठा 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे.  येरळवाडी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. कोयना- 95.89, धोम -90.62, कण्हेर-91.06, वारणावती-96.13, दूधगंगा-95.77, राधानगरी-99.51, तुळशी-99.21, कासारी-94.65, पाटगाव-98.22, धोम बलकवडी-95.34, उरमोडी-89.98,  तारळी -85.87 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे .