होमपेज › Pune › निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे सर्व स्तरातून स्वागत

निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे सर्व स्तरातून स्वागत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मराठा क्रांती  मोर्चोच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. मोर्चाच्या वतीने पीडितेला डेक्कन येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पसायदान म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले की, कोपर्डीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही मराठा क्रांती मोर्चातून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत राज्य सरकारने हे प्रकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याद्वारे चालवले. आरोपीना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तिला न्याय मिळाल्याची भावना आमच्यात आहे. 

श्रद्धांजली सभेस संतोष जाधव, सुनील बारणे, नाना निवगुणे, तुषार काकडे, शंकर शिवले, अनिल ताडगे, सुशील पवार, गणेश मापारे, दिपाली पाटोळे, अमृता पठारे, रेखा कोंडे, अश्‍विनी शिंदे, सुरेखा हरगुडे आदी उपस्थित होत्या. दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी मराठा क्रांती मोर्चोच्या वतीने एक हेल्पलाइन सुरू करण्यात यावी, अशी मागणी काही महिला समन्वयकांनी केली. एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर तिला त्या हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत मिळेल. त्यामुळे कोपर्डीसारख्या घटना होणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.