Thu, Jun 27, 2019 18:39होमपेज › Pune › रंगभूमीमुळे आपण स्वत:ला शिकवू शकतो विक्रम गोखले 

रंगभूमीमुळे आपण स्वत:ला शिकवू शकतो विक्रम गोखले 

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:15AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

नाटकाकरिता कलावंताला विशिष्ट आवाज लागतो. माझा नाटकाचा आवाज मी गमावलाय. त्यामुळे मी सध्या रंगभूमीवर नाही. मी पोलिस आणि सैनिकांचा नेहमीच सन्मान करत आलो आहे. तरुण लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. आजच्या पिढीतील तरुण रंगभूमीशी निगडीत काहीतरी करत आहे, त्याचा मला आनंद आहे. रंगभूमीवर असेच आनंदाने काम करायला हवे. दुसरा काय चुका करतो, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. रंगभूमीमुळे माणूस प्रत्येक वेळी स्वत:ला काहीतरी शिकवू शकतो, असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. 

क्विक हील फाउंडेशन आणि पुणे-सायबर पोलिसांच्या सहकार्याने सायबर सुरक्षा जागृतीसाठी ‘साय-फाय करंडक’ या एकांकिका  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी निर्माता, पटकथालेखक नागराज मंजुळे, क्विक हीलचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, सायबर क्राईम पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि एक्सप्रेशन लॅबचे संचालक प्रदीप वैद्य उपस्थित होते.
नागराज मंजुळे म्हणाले, सायबर गुन्हेगारी हा प्रकार गंभीर आहे. एक विकृत माणूस कुठेही बसून वाट्टेल ते करू शकतो, या गोष्टीकडे जबाबदारीने पाहायला हवे. विशेषतः सोशल मीडिया वरून जे काही पसरविले जाते ते गंभीर आहे.    

साय-फाय करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर या सहा केंद्रांवर पार पडली. भरत नाट्यमंदिर येथे 22 ते 24 डिसेंबर रोजी होणार्‍या अंतिम फेरीसाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. चित्रपट व नाट्य कलावंत आलोक राजवडे, अश्‍विनी गिरी परीक्षक म्हणून काम पाहतील.