Sun, Jul 12, 2020 21:05होमपेज › Pune › विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत प्रगती पॅनेलचा झेंडा 

विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत प्रगती पॅनेलचा झेंडा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली. विद्यापीठ एकता पॅनलला २ जागावर समाधान मानावे लागले आहे. 

व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले तर सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या. तर विद्यापीठ एकता पॅनेलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५६ मते घेऊन सोमनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाले. व्यवस्थापन प्रतिनिधी पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकही उमेदवार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. 

अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरची मतमोजणी सुरु असून त्याचा निकाल रात्री उशीर पर्यन्त लागण्याची शक्यता आहे. पदवीधरच्या १० जागांसाठी १९ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

मुख्यमंत्र्याच्या भावाच्या निकालाकडे लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी अधिसभा पदवीधरची जागा लढवलेली आहे. त्यांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशीरा पडवीधरचा निकाल जाहीर होईल.