Wed, Feb 20, 2019 10:37होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नीकरणासाठी मागवले अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नीकरणासाठी मागवले अर्ज

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:34AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाने मंजूर केलेल्या बृहद् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालये, तसेच परिसंस्था यांना 2018-19 च्या मान्यतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नीकरण देण्यासाठी अर्ज मागवले आहेत. पुणे, नगर, नाशिक या तीन शहरांत मिळून जवळपास 50 महाविद्यालये प्रस्तावित आहेत. या महाविद्यालयांना संलग्नीकरणासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने नवीन महाविद्यालये, तसेच परिसंस्था यांना मान्यतेसाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंतचे प्रस्ताव मागितले होते. परंतु राज्य शासनाने 28 नोव्हेंबर 2017 रोजी सुधारणा सुचविणारे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यास अनुसरून आता महाविद्यालये, तसेच संस्थांना अर्ज करावे लागणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने ज्या महाविद्यालयांनी याअगोदर अर्ज केले आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून त्यांचे यापूर्वी केलेले अर्ज विचारात घेतले जाणार असल्याचे कळवले आहे.

बी.एस्सी.(एव्हीएशन) स्वतंत्र महाविद्यालय या प्रकारच्या महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादर करताना केंद्रीय, राज्यपातळीवरील, स्थानिक स्तरावरील आवश्यक त्या मान्यता व परवानगी घेण्याच्या अटीवरच प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना देखील विद्यापीठ प्रशासनाने सांगितली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण 24 ,अहमदनगर 14 आणि नाशिक 12 अशी एकूण 50 महाविद्यालये प्रस्तावित असल्याचेदेखील विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.