Sun, May 26, 2019 17:38होमपेज › Pune › रेल्‍वेखाली उडी घेवुन एकाची आत्‍महत्‍या 

रेल्‍वेखाली उडी घेवुन एकाची आत्‍महत्‍या 

Published On: Jun 02 2018 6:07PM | Last Updated: Jun 02 2018 6:07PMपुणे : प्रतिनिधी 

घोरपडी पेठेतील जितेंद्र जगताप (वय 53) यांनी आज बी.टी कवडे रोडजवळ रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. तत्‍पूर्वी त्‍यांनी एक चिट्ठी लिहली असून, त्यात बिल्डर, व नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित असल्याचे म्हंटले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, घोरपडी पेठ इथल्‍या जितेंद्र जगताप यांनी बी टी कवडे रेल्‍वे स्‍टेशनजवळ रेल्‍वेखाली उडी घेत आत्‍महत्‍या केली. तत्‍पुर्वी त्‍याने रास्तापेठ समर्थ पोलीस स्थानकाच्या समोर असलेल्या जागे मध्ये ६ लोकांबरोबर फोटो काढला व तेथुन त्यांना आत्महत्या करायला चाललो असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर ओळखीच्या रिक्षाचालकाच्या रिक्षात बसुन बीटी कवडे रोड येथे जाऊन चिठ्ठी रिक्षाचालकाजवळ दिली. आणि रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या चिठ्ठी मध्ये दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व फोटोतील ६ जणांच्या त्रासाला वैतागुन मी आत्महत्या करत आहे, असे लीहले आहे.  फोटो काढलेल्या सहा जणांना समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.

जितेंद्रचे भाउ शैलेश जगताप यांच्या म्हणण्याप्रमाणे दीपक मानकर यांनी त्यांच्या भावाचा खून केला आहे, व ३०२ चा गुन्हा पोलीसांनी दाखल करावा, अशी त्यांची मागणी केली आहे