होमपेज › Pune › पवना धरणात बुडून दोघांचा मृत्‍यू

पवना धरणात बुडून दोघांचा मृत्‍यू

Published On: Jan 07 2018 5:33PM | Last Updated: Jan 07 2018 5:33PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

मौजे ठाकुरसाई बाजूकडील पवना धरणाच्या बॅकवॉटर येथे आज रविवार सकाळी ६ मुले व ३ मुली फिरण्यासाठी आली होती. यातील सगळे सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात फोटो काढण्यासाठी तसेच आंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्‍याने यातील दोघे बुडाल्‍याची घटना घडली.

ही घटना घडत असाताना  पाहून त्यांना वाचविण्यासाठी वेदप्रकाश चंदनलाल राणा (वय २८) रा. ४१८/बी,हिंगाना रोड राममंदिर लोकमान्य नगर, नागपूर व शुभम कैलाश बम्मी हे पाण्यात उतरले व ते ही बुडू लागल्याने त्यांच्या सोबतीच्या इतरांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. यावेळ जवळच असलेल्या गावकऱ्यांनी त्या चौघांपैकी दोघांना वाचविले मात्र  वेदप्रकाश चंदनलाल राणा व मोहीत अनिल जाधव या दोघांचा पाण्यात बुडून मृत्‍यू झाला. लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक इंगवले सो, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी INS शिवाजी चे कमांडन्ट श्रीवास्तव, नेगी, विनोद व शिवदुर्ग टीमच्या मदतीने बुडलेल्‍या दोघांचे मृतदेह  बाहेर काढण्यात आले. या घटनेचा पुढील तपास तपास लोणावळा ग्रामीण चे पोलीसांकडून सुरू आहे. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात पाण्यात उतरू नये तसेच फिरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आर.जे.इंगवले यांनी केले आहे.