Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Pune › पुणेः भिगवणनजीक अपघातात सख्या बहिणी ठार

पुणेः भिगवणनजीक अपघातात सख्या बहिणी ठार

Published On: May 10 2018 1:50PM | Last Updated: May 10 2018 1:50PMभिगवण : प्रतिनिधी 

भिगवण जवळील डाळज येथे ट्रकला ओव्हरटेक करताना लक्झरी बसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे लक्झरी बस खड्ड्यात पडून पलटी झाली. या अपघातात खडकी (पुणे) येथील दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. 

चैताली दगडू सोनकांबळे (वय८) व ऋतिका दगडू सोनकांबळे (वय ५ रा.आंबेडकर चौक, भाऊपाटील रोड, खडकी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळील डाळज येथे काल रात्री रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला. इतर किरकोळ जखमींना भिगवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

लक्झरी बस सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. डाळज येथे ही लक्झरी बस आली असताना समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचा ताबा सुटला आणि बस खड्ड्यात जाऊन ऊसाच्या शेतात पडून पलटी झाली. यामध्ये दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. इतर किरकोळ जखमींना भिगवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

pune, two sister death, accicent, bhigvan , pune news