Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Pune › शहरात मरणेही कठीण

शहरात मरणेही कठीण

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:02AMपुणे  :प्रतिनिधी 

शहरात जगणे कठीण आहे असे म्हटले जाते; पण पुणे शहरात मरणेही कठीण झाले असून, 40 लाख लोकसंख्येच्या पुण्यात केवळ दोन पुष्पकगाड्या असल्याचे समोर आले आहे. याच नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. अखेर येत्या महिन्याभरात 3 नव्या गाड्या घेण्याचे आश्वासन आयुक्‍तांनी  दिल्यावर या विषयावर पडदा पडला. शिवसेनेचे सभासद बाळा ओसवाल यांनी प्रश्न उपस्थित केला. फक्त 2 पुष्पकगाड्या  महापालिकेकडे असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

त्यावर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली असूनही अद्याप गाड्या का आल्या नाहीत, असे विचारले. महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाने दिरंगाई केली असेल तर अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी असेही ते म्हणाले. भाजपच्या धीरज घाटे यांनी चौदा क्षेत्रीय कार्यालयांना  चौदा पुष्पकगाड्या देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अशा वेळी खासगी गाड्याचे चालक अडवणूक करतात, असेही म्हणाले.  आयुक्त कुणालकुमार यांनी खुलासा करताना पुढील महिन्यात तीन गाड्या येतील असे सांगितले. दिरंगाई का झाली त्याचा अहवाल मुख्य सभेला सादर करू आणि दोषींवर कारवाई करू असेही त्यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी पुढील महिन्याच्या आत अहवाल ठ ण्यात यावा असे आदेश दिले.रात मरणेही कठीण !