Wed, Jan 23, 2019 05:30होमपेज › Pune › ७०० रूपयांची लाच घेताना वाहतूक कर्मचारी जाळ्‍यात

७०० रूपयांची लाच घेताना वाहतूक कर्मचारी जाळ्‍यात

Published On: Apr 25 2018 7:18PM | Last Updated: Apr 25 2018 7:18PMपुणे : प्रतिनिधी

वाहन चालकाकडून 700 रूपयांची लाच घेताना पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान आधीच पुणेकर रोजच्या वाहतुकीने मेटाकुटीला आलेले असताना वाहतूक पोलिसांच्या पैसे लुटीच्या प्रकारामुळे आणखीनच त्रास सहन करावा लागत आहे.

रमेश शिरसाठ (पोलीस कॉन्स्टेबल, विश्रामबाग विभाग) असे रंगेहात पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हेल्मेट न घालने तसेच वाहतूक  नियमावर बोट ठेऊन वाहन चालकाकडून 700 रूपयांचा दंड म्हणून 700 रूपये पोलीस कॉन्स्टेबलने मागीतले होते. दरम्यान वाहन चालकाने तत्काळ एसीबीला तक्रार केली. तक्रार येताच पुणे एसीबीच्या पथकाने टिळक चौकात सापळा रचून 700 रूपये घेताना या कॉन्स्‍टेबलला रंगेहाथ अटक केली.