Mon, Nov 12, 2018 23:23होमपेज › Pune › वाहतूक कोंडी जैसे थे

वाहतूक कोंडी जैसे थे

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

शहरात मंगळवारीही वाहतुकीचा वेग संथगतीने सुरू होता. आठवड्याची सुरुवात वाहतूक कोंडीने झाल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर सलग दुसर्‍या दिवशी संततधार पावसामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे कामावर जाणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर टिळक रस्त्यावर कमानी टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे जागोजागी तसेच चौकाचौकांत साहित्याचे टेम्पो उभे करण्यात आले होते. तर काही चौकात रस्त्यातच उभारण्यात आलेल्या कमानीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पर्यायी सदाशिव पेठ, नारायण पेठ मार्गे विविध ठिकाणी जाणार्‍या वाहनचालकांमुळे पेठांतील वाहतूक खोळंबली.  

टिळक रस्त्यासह दांडेकर चौक, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रोड, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांचे पार्किंग दिसून आले. त्यामुळे परिसरातील वाहतूकीला खोडा निर्माण झाला. त्यातच बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली हेाती. 
काही चौकातील सिग्नल यंत्रणा बंद, वेडीवाकडी वळणे घेत वाहन चालविणार्‍या चालकांमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.