Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Pune › तीन हजाराच्या पगार पत्रकामुळे शिक्षक पतीचा बनाव उघड

तीन हजाराच्या पगार पत्रकामुळे शिक्षक पतीचा बनाव उघड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कमी पगार दाखविण्यासाठी तीन हजार रूपयांचे पगारपत्रक दाखल करणार्‍या शिक्षक पतीचे पितळ न्यायालयात उघडे झाले आहे. कमी पगार असल्याचा बनाव करणार्‍या पतीला पत्नीला पाच हजार रूपयांची पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी हा आदेश दिला आहे.  

अर्जदार पत्नी आणि तिच्या पतीचा विवाह वैदिक  पध्दतीने झाला.  या लग्नासाठी मुलीच्या वडिलांना सात लाख रूपये खर्च आला. ती   नांदायला आल्यानंतर सासरच्या लोकांकडून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. काम येत नाही, कपडे व्यवस्थित धुता येत नाही, क्षयरोग झालेल्या रूग्णासारखी दिसते असे  टोमणे सहन करावे लागले.  

तांत्रिकाकडून विभूती आणून तिला पाण्यात टाकून प्यायला लावली जात असे. तसेच गारगोटीचे दगड  तिच्या अंथरुणाखाली ठेवण्यात येत. तिला मुलगा व्हावा म्हणून तिच्यावर दबाव आणला.  तिच्यावर संशय घेऊन नवरा मोबाइल चेक करत असे. रात्री उशीरा दारू पिऊन  तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ करत असे. तिला अपमानास्पद वागणूक दिली.   गर्भपात व्हावा म्हणून तिला गोळ्या खाण्यास भाग पाडले.सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. त्यानंतर तिला ते परत घेऊन गेले नाहीत.

तिच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा विनंती करूनही तिला नांदायला नेण्यास नकार दिला. याप्रकरणी तिने न्यायालयात अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. पतीकडून पोटगी अणि घरभाड्यापोटी रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी दाव्यात केली. न्यायालयाने तिचा दावा मंजूर करताना पाच हजारांची पोटगी मंजूर केली