Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Pune › थर्टी फर्स्टची जय्यत तयारी

थर्टी फर्स्टची जय्यत तयारी

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:45AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी पुण्या-मुंबईसह सर्वत्र सुरू आहे. क्लब, हॉटेल व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमासह जेवण व विविध प्रकारच्या मद्याचाही समावेश आहे. या वेळी रविवारी थर्टी फर्स्ट येत असल्यामुळे सर्वत्र धम्मालच आहे. विशेषत: तळीरामांसाठी ही थर्टी फर्स्ट व्हिस्कीत साखर असल्यासारखीच आहे. काही गृहनिर्माण सोसायट्या सज्ज झाल्या आहेत.

क्लब व हॉटेल मालकांनी जेवण, डीजे, लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम व दारूसह प्रतिकपल सहा हजार रुपयांचे पॅकेज ठेवले आहे. अनेक बारमधील थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी मेनू कार्ड बदलून त्याचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. अनेक ठिकाणी रिसॉर्टने प्रतिमाणशी 700 ते 800 रुपये प्रवेश शुल्क व रूमचे स्वतंत्र भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अनेकजणांनी आपल्या सोसायटीच्या गच्चीवरच मित्र तसेच नातेवाइकांसमवेत खास पार्टीचे आयोजन केल्याचेही सांगण्यात आले.