Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Pune › पाणीपट्टी थकबाकीच्या लोक अदालतीला थंड प्रतिसाद

पाणीपट्टी थकबाकीच्या लोक अदालतीला थंड प्रतिसाद

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:12AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

पाणीपट्टीच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे आयोजित केलेल्या लोक अदालतीकडे थकबाकीदारांनी पाठ फिरवल्याने थंड प्रतिसाद मिळाला. 10 टक्के सुट देण्याची घोषणा करून या लोकअदालतीमध्ये केवळ 113 थक बाकीदारांनीच सहभाग घेतला. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार  त.  शहरवासीयांकडून वेळच्या वेळी पाणीपट्टी भरली जात नसल्याने पालिकेची कोट्टावधी रुपयाची पाणीपट्टी थकलेली आहे. पाणीपट्टी वसुल करण्यासाठी प्रशासनाकडून विविध मोहिमा हाती घेतल्या जातात. मात्र माननियांच्या हस्तक्षेपामुळे पाणीपट्टी वसुल होत नाही.

पाणीपट्टीपोटी थकलेली रक्कम वसूल करण्यासाठी शनिवारी लोक अदालतीचे आयोजन केले होते. या लोक अदालतीमध्ये 28 कोटीच्या थकबाकीसाठी 450 थकबाकीदारांना बोलावले होते. खटले दाखल करण्यापूर्वी या लोक अदालतीमध्ये सहभागी झालेल्या थकबाकीदारांना 10 टक्के सुटीची घोषणा करत  तीन वर्षापेक्षा जुन्या पाणीपट्टी थकबाकीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचेही आवाहन केले होते. दहा टक्के सूट देण्याची घोषणा करूनही थकबाकीदारांनी लोक अदालतीकडे पाठ फिरवल्याने 28 कोटींपैकी फक्त 58 लाख रुपयेच थकबाकीपोटी जमा झाले आहेत. ही रक्कम थकबाकीत 10 टक्के सूट देऊन जमा झालेली आहे. यापूर्वी दोन वेळा आयोजित केलेल्या पाणीपट्टीच्या लोक अदालतीमध्ये अनुक्रमे 500 आणि 350 थकबाकीदारांनी सहभाग घेतला होता. या दोन लोक अदालतीमधून 5 कोटी थकबाकी वसुल झाली होती.  

दरम्यान या अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीराम मोडक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालिका न्यायालयाच्या न्यायाधिश अनुराधा पाडुळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विधी समितीच्या अध्यक्षा गायत्री खडके, शहर  सुधार समितीचे अध्यक्ष महेश लडकत, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, प्रमुख विधी सल्लागार रविंद्र थोरात, विधी अधिकारी मंजुषा इधाटे आदी उपस्थित होते.